हरिहर कुंभोजकर - लेख सूची

श्री. जोशींना दिसलेल्या विसंगतींचे पोस्ट-मॉर्टम

निखिल जोशी ह्यांनी माझ्या लेखाची इतकी सविस्तर दखल घेतली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांचे उत्तर माझ्या लेखाबरोबरच प्रसिद्ध झाले याचा अर्थ माझा लेख प्रसिद्धीपूर्वीच त्यांना उपलब्ध झाला होता हे उघड आहे. लेखाच्या शेवटी माझा फोन नंबर आणि ई-मेल ID असल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर अधिक सविस्तर चर्चा होऊ शकली असती. त्यांच्या लेखाचे स्वरूपही …

हिरण्यकश्यपूचे मिथक* आणि लाप्लासचे उत्तर  – नास्तिक परिषदेच्या निमित्ताने 

दानव सम्राट हिरण्यकश्यपू याला वरदान प्राप्त झाले होते: तुला मृत्यू दिवसाही नाही; रात्रीही नाही. राजवाड्याच्या आतही नाही; बाहेरही नाही. माणसाकडूनही नाही, मानवेतर प्राण्याकडूनही नाही. हिरण्यकश्यपू विद्वान होता. द्विमूल्य तर्कशास्त्रातील प्राविण्याबद्दल त्याला विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी देऊन शुक्राचार्य विद्यापीठाने त्याचा गौरव केला होता. त्याला वाटले आता आपण अमर झालो. सामर्थ्यवान तर तो होताच. तो स्वतःलाच परमेश्वर …

नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत: १. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे. ३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला …

संवैधानिक, सांस्कृतिक राष्ट्रीयत्व आणि भारताची अखंडता

काही दिवसांपूर्वी एका प्रमुख राजकीय पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याने भारताच्या ‘राष्ट्र’ म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा काही भारतीय विद्यापीठात पूर्वीही दिल्या गेल्या आहेत. तारुण्यसुलभ बंडखोरीतून केलेली बालिश बडबड समजून विद्यार्थ्यांच्या घोषणांकडे दुर्लक्ष करणे शक्य असते. पण प्रस्तुत वक्तव्य ज्या नेत्याने केले आहे, त्याच्या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले होते …

माफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही!

इंग्रजी पोर्टल scroll.in यावर १७ जून रोजी “As China’s Communist Party t­­urns 100, Indian leaders would do well to learn from its success” या शीर्षकाचा श्री. सुधींद्र कुलकर्णी यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला आहे. “चीनच्या शतायुषी पक्षाकडून भारतानं काय शिकावं ?” या शीर्षकाखाली त्याचा अनुवादही आता उपलब्ध आहे. लेखाचा दोन-तृतियांश भाग चीनने केलेल्या देदीप्यमान प्रगतीचा आढावा आहे. उरलेल्या एक-तृतियांश भागात भारताने ‘चिनी कम्युनिस्ट …

आमच्या लोकशाहीचे भवितव्य

Fair is foul and foul is fair,Hover through the dark and filthy air. स्वैर अनुवाद:चांगले ते ते वाईट आणि वाईट ते ते चांगले,काळोखातल्या गटारगंगेत नागवे होऊन नाचले ।।—- मॅकबेथ स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्ही लोकशाही राज्यपद्धती स्वीकारली. स्वातंत्र्य चळवळीत ज्यांच्याकडे नेतृत्व होते त्यांच्याकडेच स्वतंत्र भारताचेही नेतृत्व जाणे स्वाभाविक होते. काळ पुढे जाईल तसा समाजात बदल होत जातो. पूर्वी …